एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटून गेला, मात्र अजूनही मुख्यमंत्री वर्षा या शासकीय निवासस्थानी वास्तव्यास गेले नव्हते. शिवसेना आणि शिंदे गटातील सत्तासंघर्ष, शिंदे - फडणवीस सरकारची अनिश्चता, सरकावर न्यायालयाचे असलेली टांगती तलवार यामुळे शिंदे हे वर्षावर वास्तव्यासाठी गेले नसल्याचे बोलले जात होते. मात्र आता दिवाळीनंतर न्यायालयाने सुनावणी पटलावर घेणार असल्यामुळे, शिंदे वर्षावर राहण्यासाठी जाणार आहेत.
#EknathShinde #UddhavThackeray #Shivsena #Varsha #Matoshree #BKC #ShivajiPark #AadityaThackeray #DevendraFadnavis #Maharashtra #HWNews