उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे अंधश्रद्धेमुळे एका 22 वर्षीय तरुणाने समाधी घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोक्ष मिळावा म्हणून चार पुजाऱ्यांच्या मदतीने त्याने मंदिराजवळील मैदानात समाधी घेतली. मात्र वेळीच पोलिसांना याबाबत माहिती मिळाली व त्यांनी घटनास्थळी पोहोचून खड्ड्यातील माती काढून तरुणाला बाहेर काढून त्याचा जीव वाचवला.