आगामी लोकसभा निवडणुकीत शरद पवारांचा बालेकिल्ला असलेला बारामती मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजपाने आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. अनेक भाजपा नेत्यांनी उघडपणे यावर भाष्यही केलंय. पण आपण इतिहासावर थोडी नजर टाकल्यावर लक्षात येतं की १९५७ मध्ये हा बारामती मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून काँग्रेस किंवा शरद पवार यांचाच पगडा या मतदारसंघावर राहिला आहे. या मतदारसंघाचा आतापर्यंतचा घेतलेला आढावा...