पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या संजय राऊत यांना आणखी 14 दिवस न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवले आहे. दरम्यान, स्पेशल पीएमएलए कोर्टाने दिलेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांच्या जामीनावर 27 सप्टेंबर पासून सुनावणी सुरू होणार आहे. संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि त्यांचे भाऊ प्रविण राऊत यांच्या जामीनावर 23 सप्टेंबर पर्यंत सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता आहे.