16 सप्टेंबरला ‘जागतिक ओझोन दिवस’ साजरा केला जातो. युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने 19 डिसेंबर 1994 रोजी 16 सप्टेंबर हा दिवस ओझोन थराच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून घोषित केला होता. ओझोन थरा विषयी जनजागृती करण्यासाठी आणि ओझोन थराचे जतन करण्यासाठी ओझोनचे महत्व समजवण्यासाठी ‘जागतिक ओझोन दिवस’ साजरा केला जातो.