राज्यात पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसाने चांगलेच झोडपून काढल्यानंतर आता भारतीय हवामान विभागाने राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आयएमडीने म्हटले आहे की, येत्या 15 तारखेपर्यंत राज्यात हलक्या, ते मध्यम आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.