राज ठाकरे दसरा मेळाव्याबाबत योग्य निर्णय घेतील Sandeep Deshpande Raj Thackeray

2022-09-03 4

"दसरा मेळाव्यावरून शिवसेना (Shiv Sena) आणि शिंदे गटात (Shinde Group) वाद पेटला आहे. दादरच्या शिवाजी पार्कवर होणारा हा मेळावा शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. 1966 पासून शिवसेना दरवर्षी येथे दसरा मेळावा घेत आहे. मात्र आता शिंदे गटानेही याठिकाणी दसरा मेळावा घेण्यास हलचाली सुरु केल्या.

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. राज ठाकरेयांना निमंत्रित करून शिवसेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना शह देण्याच्या तयारीत शिंदे गट असल्याची माहिती आहे. या सर्व घडामोडींवर मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी पत्राद्वारे मनसैनिकांची भूमिका मांडली आहे."

#RahThackeray #MNS #EknathShinde #ShivajiPark #UddhavThackeray #BJP #HWNews

Videos similaires