राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भाजपच्या (BJP) राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना राष्ट्रवादी प्रवेशाची ऑफर दिली आहे. पक्ष वाढविणाऱ्यांचे भाजपमध्ये पंख छाटले जातात, हे रोहिणी खडसे यांच्या लक्षात आले, त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्याच पद्धतीने पंकजा मुंडे यांनीही पाऊल उचलावं, असे विधान आमदार मिटकरी यांनी केले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना भाजपत डावलेले जात आहे, याची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
#PankajaMunde #AmolMitkari #SharadPawar #Beed #BJP #NCP
#RohiniKhadse #EknathKhadse #Maharashtra #DevendraFadnavis #EknathShinde #HWNews