काही दिवसांपूर्वीच टिकटॉक स्टार ,बिग बॉसची स्पर्धक अभिनेत्री आणि भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याची बातमी समोर आली आणि आता याबाबत दररोज नवेनवे खुलासे होतायत... नुकतंच एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.ज्यामध्ये सोनाली फोगट यांना कोणतं तरी द्रव्य पाजत असतानाचा हा व्हिडीओ आहे... नेमकी सोबतची व्यक्ती कोण आहे हे अद्याप समोर आलेलं नाही.... तर याप्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आली... तर आतापर्यंत एकूण चार जणांना गोवा पोलिसांनी अटक केलीय...