औरंगाबादचे भाजप आमदार प्रशांत बंब आणि शिक्षक यांच्यातला वाद आता पोलीस स्थानकात पोहोचलाय... शिक्षकांचा घरभाडे भत्ता बंद करावा अशी मागणी विधानसभेत केल्यानं भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्यावर शिक्षकांचा रोष आहे. आमदार बंब यांना फोन करून जाब विचारणाऱ्या एका महिलेनं अर्वाच्च भाषा वापरत धमकी दिल्यानं तिच्याविरोधात पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आलाय