मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर दुरूस्तीचे काम चालू असल्यामुळे टोल न आकारण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तात्पुरती टोल माफी मिळणार आहे. तसेच द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर सध्या दुरूस्तीचे काम सुरू आहे. ओव्हरहेड गॅन्ट्रीच्या कामामुळे या महामार्गावर सध्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होतेय. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आलाय.