कोकणवासीयांसाठी आनंदाचा दिवस आणि अभिमानाचा. कारण सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ न्यायमूर्ती उदय लळीत भारताचे ४९ सर न्यायाधीश म्हणून शपथ घेतील. हा क्षण सर्वासाठीच आनंदाचा आहे. मात्र सिंधुदुर्गवासियांना आणि त्यातही लळीत कुटुंबीयांना विशेष अनुप आहे. अतिशय मृदू स्वभावाचे पण कर्तव्यकठोर, मितभाषी, मुख आणि अभ्यासू म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. ज्येष्ठ वकील म्हणून अनेक 'हाइप्रोफाइल' खटल्याचे कामकाज चालविलेले आणि आता न्यायमूर्ती झाल्यावरही अनेक महत्त्वाच्या खटल्यांचा निकाल दिलेले न्या. लळीत यांची सरन्यायाधीश पदाची कारकीर्दही निःस्पृह आणि अभिमानास्पद अशीच असेल.