Operation Lotus दिल्लीत अपयशी ठरलं? पण भाजप ‘आप’च्या मागे का ? | Sakal Media

2022-08-26 120

ऑपरेशन लोटस हे सध्या संपूर्ण देशभरातील राजकारणात चांगलंच चर्चेत आहे. २०१९ साली आणि त्यानंतरही महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस राबवण्यात आलं. त्याअंतर्गत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. आताही राज्यातील सत्तांतरावेळी शिंदे गटाला बाजूला करण्यात भाजपचा हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात नक्कीच झाली. त्यात आता भाजपचा निशाणा हा अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षावर असल्याचं दिसतंय. त्यामुळे महाराष्ट्रानंतर आता दिल्लीतही भाजपनं ऑपरेशन लोटस सुरु केल्याची चर्चा आहे. आणि या चर्चेला आज पूर्णविराम देऊन भाजपचं दिल्लीतील ऑपरेशन लोटस केजरीवालांनी अपयशी ठरवल्याचा दावा आप नेते सौरभ भारद्वाज यांनी केला.

Videos similaires