नाशिकमध्ये काल एसीबीनं केलेल्या कारवाईत आदिवासी विकास बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल यांना लाच घेताना रंगेहात पकडलं होतं... त्यानंतर एसीबीनं त्यांच्या नाशिक, पुणे आणि धुळ्याच्या घरी केलेल्या छापेमारीत कोट्यवधी रुपयांचं घबाड हाती लागल्याची माहिती आहे.... बागुल यांच्या नाशिक आणि पुण्याच्या घरातून १ कोटी ४४ लाख रुपयांची रोकड आणि काही महत्वाची कागदपत्रं मिळाल्याची माहिती आहे.... अडीच कोटींच्या एका कामाला मंजुरी देण्यासाठी बागुल यांनी २८ लाखांची लाच मागितली होती आणि ती स्वीकारताना त्यांना पकडण्यात आलं होतं.. त्यानंतर काल दुपारपासून त्यांच्या घरी झाडाझडती सुरू आहे... दिनेश कुमार बागुल यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आसून त्यांची कोठडी मिळवण्यासाठी एसीबीचे प्रयत्न असतील