२०१४ ते २०२१ दरम्यान राज्य सरकारच्या विविध विभागांमार्फत निवड झालेल्या मराठा उमेदवारांना नियुक्त्या देण्यात येणार आहेत.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची घोषणा केलीय... मराठा आरक्षण आणि अन्य मागण्यांच्या बाबतीत काल सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली... या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदेंनी ही घोषणा केलीय.. मराठा आरक्षण निवडसूचीतील १ हजार ६४ उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी जाहीर केले. या नियुक्त्या करण्याबाबतचा अध्यादेश तातडीने काढण्यात येईल तसेच या उमेदवारांना तातडीने नियुक्त करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.. तसंच उर्वरित ७०२ उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तसेच विभागांमार्फत विशेष मोहीमही राबविण्यात येईल असे शिंदेंनी स्पष्ट केलंय.. सरकारच्या या निर्णयाचे संभाजीराजे छत्रपती यांनी स्वागत केलंय.. दरम्यान या बैठकीत मराठा आरक्षणावर कोणतीही चर्चा झाली...