मुंबईतल्या वरळी, ना. म. जोशी आणि नायगाव बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प म्हाडामार्फत राबवण्यात येत आहे. या बीडीडी चाळींच्या पुनर्विकास योजनेंतर्गत पोलिसांना स्वमालकीची घर मिळणार आहेत. या घरांच्या किंमती परवडणाऱ्या नसल्यानं आता १५ लाखांमध्ये ही घर पोलिसांना देण्यात येतील अशी महत्वाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत केली.
#EknathShinde #Maharashtra #VidhanSabha #Shivsena #MumbaiPolice #FreeHouse #HWNews