आपल्या पिताश्रींबद्दल लाज वाटली पाहिजे असं कसं बोलू शकता?; मुनगंटीवार आदित्य ठाकरेंवर तापले |

2022-08-25 12

विधानसभेत आदिवासी आणि कुपोषित बालकांच्या प्रश्नावरून चर्चा सुरू असताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या एका शब्दाने सभागृहात जोरदार खडाजंगी झाली. एकही बालमृत्यू कुपोषणामुळे झाला नसल्याचे उत्तर आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांनी दिले. यावर विरोधाकांनी जोरदार आक्षेप घेतला. "आदिवासी समाजासाठी आपण काही करू शकलो नाही, याची राजकारणी म्हणून आपल्याला लाज वाटली पाहिजे", असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले. त्यावर सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आक्षेप घेत असंसदीय शब्द असल्याचे म्हटले. अडीच वर्ष आपण सत्तेत होता, आपल्या पिताश्रींना लाज वाटली असे म्हणायचे का, असे मुनगंटीवार यांनी म्हटले.

#AadityaThackeray #SudhirMungantiwar #VijayKumarGavit #MLC #VidhanSabha #ShivSena #BJP #MahaVikasAghadi #UddhavThackeray #Adivasi #HWNews

Videos similaires