अकोल्याच्या वसंत देसाई स्टेडियमवर काल संध्याकाळी धावण्याचा सराव करत असताना एका तरुणीचा मृत्यू झालाय. रोशनी अनिल वानखडे असं या तरुणीचं नाव आहे.. रोशनी अकोल्यात पोलीस भरतीची तयारी करीत होती. तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. रोशनीच्या मृत्यूमुळे मैदानावर धावण्याचा सराव करणाऱ्या अनेकांना धक्का बसला आहे. आधीच वडिलांचे छत्र हरवलेले असताना पोलीस होऊन कुटुंबाला हातभार लावेन, असं तिचं स्वप्न होते. मात्र रोशनीच्या अचानक जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.