आपल्या धडाकेबाज वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले केेंद्रीय मंत्री नितीन गडकरी आता एका नव्या वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत... माझं मंत्रिपद गेलं तरी मला काहीही फरक पडत नाहीत.. असं वक्तव्य गडकरींनी एका कार्यक्रमात केलंय.. कुपोषणाबाबत बोलताना गडकरींनी एक किस्सा सांगितला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. आणि राजकीय गोटात सध्या या वक्तव्याची चर्चाही आहे.