तिकडे विधानभवनात शिंदे गटाच्या आमदारांनी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरून थेट ठाकरेंवर निशाणा साधला असताना, काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनीही आज शिवसेनेवर निशाणा साधला. मुंबईकरांना गेली 5 वर्षे कुणी लुटलं याची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी मिलिंद देवरा यांनी केलीय. मुंबईतील रस्त्यांवर गेल्या पाच वर्षांत 12 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. हा खर्च गेला कुठे असा सवाल मिलिंद देवरा यांनी केलाय.