मुंबई महापालिकेतील व्हर्चुअल क्लासरुमच्या निविदेतील भ्रष्टाचाराची चौकशी करा, अशी मागणी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केलीय. मुंबई मनपाच्या ४८० शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरुम चालवण्यासाठी काढलेल्या निविदेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केलाय. महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पत्र लिहून शेलार यांनी या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केलीय.