शिवसेनेतील उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात सुरू असलेला सत्तासंघर्ष आता पाच सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग करण्यात आला आहे. पुढील सुनावणी आता 25 ऑगस्टला होणार आहे. विशेष म्हणजे, 26 ऑगस्टला सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे निवृत्त होत आहेत. त्यानंतर न्यायमूर्ती उदय ललित यांची सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती होणार आहे. त्यामुळे घटनापीठाचे नेतृत्व कोणापुढे असेल हे 25 ऑगस्टला स्पष्ट होईल. पण घटनापीठ म्हणजे नक्की काय? घटनापीठाची स्थापना कधी होते? या घटनापीठात किती न्यायाधीश असतात? नेमकं कशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये घटनापीठाची स्थापन केली जाते? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
#EknathShinde #UddhavThackeray #SupremeCourt #ShivSena #Elections #NVRamana #Maharashtra #MonsoonSession #HWNews