राज्य विधिमंडळाचे आज, बुधवारपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन आजवरच्या अधिवेशनांपेक्षा फारच वेगळे ठरणार आहे. गेली अडीच वर्षे विरोधी बाकावर असताना ज्यांनी सरकारवर सडकून टीका केली तो भाजप आता सत्ताधारी बाकावर बसणार असल्याने त्यांची सरकारच्या बाजूने उभे राहताना कसोटी लागणार आहे. गेल्या अनेक दिवसात मंत्रीमंडळ विस्तार, खातेवाटप या मुद्द्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांनी कडाडून टीका केली आहे. याचीच पुनरावृत्ती या अधिवेशनात पाहायला मिळू शकते. अशातच बाळासाहेब थोरात यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
#MaharashtraAssemblyMonsoonSession #Adhiveshan #BalasahebThorat #Congress #INC #VidhanBhavan #CMEknathShinde #DevendraFadnavis #ShindeSarkar #MaharashtraCabinet #HWNews