विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर (Mumbai-Pune Expressway) अपघाती निधन झालं. मेटे यांच्या गाडीचा ज्या प्रकारे अपघात झाला, त्यावरून काही प्रश्न उपस्थितीत केले जात आहे. पोलिसही या प्रकरणाचा तपास करत आहेत. अशात अण्णासाहेब मायकर यांची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. तसेच विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे (Jyoti Mete) यांच्या वक्तव्यामुळे या प्रकरणातील गूढ आणखीनच वाढलं आहे. विनायक मेटे यांना अपघातानंतर रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हा त्यांचा चेहरा पांढराफटक पडला होता. ही गोष्ट खूप विचित्र असल्याचं ज्योती मेटे यांनी सांगितलंय. त्यामुळे विनायक मेटे यांचा अपघात नव्हे तर घातपात होता, असे आरोप सातत्याने सुरु आहेत.
#VinayakMete #JyotiMete #Shivsangram #CallRecording #MumbaiPuneExpressway #BJP #Maharashtra #Shivsena #EknathShinde #DevendraFadnavis #HWNews