स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त कळंब येथे काढण्यात आली 1075 फुट ऐतिहासिक तिरंगा ध्वज रॅली.

2022-08-14 23

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे सकल कळंबकरांच्या वतीने भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली.७५ व्या स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून १०७५ फूट लांबीच्या तिरंगा पदयात्रा काढली यामध्ये कळंब तालुक्यातील सामाजिक संस्था,संघटना,राजकीय पक्षाचे पदाधिकारी,शाळा, महाविद्यालयाचे कर्मचारी,विद्यार्थी व हजारो कळंबकर पदयात्रेत सामील झाले होते.छत्रपती संभाजी महाराज चौकातून येथून सुरु होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक,डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते  शहीद स्मारक येथे सामुहिक राष्ट्रगीताने या रॅलीचा समारोप केला.देशाप्रती असलेले प्रेम व आदर व्यक्त करण्यासाठी शहरातील नागरिक, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थीनी तसेच विविध सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या.कळंब शहरात अशा पद्धतीची तिरंगा यात्रा प्रथमतःच काढण्यात आली.

Videos similaires