शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांची बोलताना माहिती दिली की असे म्हणतात की शिवसेनेतून बंडखोरी करणाऱ्या आमदारांना खोक्याने पैसे देण्यात आले आहे म्हणून यांना प्रति शिवसेना भवन बांधण्याचे वेड लागले आहे. मात्र शिवसेना भवन हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी बांधले असून ते शिवसैनिकांसाठी मंदिर आहे. प्रति शिवसेना भवन बांधून आम्ही शिवसैनिक आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून करण्यात येत आहे मात्र मुंबईतील शिवसैनिक हे सहन करून घेणार नाही यासाठी शिवसैनिकांना मार खावा लागला किंवा जेलमध्ये जावं लागलं तरी चालेल मात्र शिवसेना भवनाची कोणी विटंबना केलेले शिवसैनिक कधीच सहन करून घेणार नाही.यांच्याकडे एवढे पैसे कुठून आले याचीही चौकशी व्हायला पाहिजे अशी टीका शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांशी बोलताना आज रोजी केली आहे.
#ChandrakantKhaire #UddhavThackeray #EknathShinde #Shivsena #ShivSenaBhavan #Dadar #SanjayShirsat #AdityaThackeray #HWNews