Maharashtra: जनता शिंदे गटावर नाराज, जनतेचा कौल उद्धव ठाकरेच्या बाजूने, सर्वेक्षणातून आले समोर

2022-08-18 1

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. भविष्यातील निवडणुकांमध्ये लोकांचा कौल काय असेल? या प्रश्नाचे उत्तर शोधले तर शिंदे गट आणि भाजपने ज्या पद्धतीने सत्तांतर केले ते लोकांना फारसे रुचले नसल्याचे दिसते. लोकसभेच्या निवडणुका आज घेतल्या तरीसुद्धा महाराष्ट्रातील जनता नव्या युती सरकारला धक्का देईन असे चित्र आहे.