नव्या मंत्रीमंडळात महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेल्यांची पुन्हा वर्णी लागणार असल्याचे सांगितलं जातंय. औरंगाबाद जिल्ह्यातील आमदार संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार हे दोघेही ठाकरे सरकारमध्ये मंत्री होते. यांनी एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडात हे दोघेही सहभागी झाले, त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून मंत्रीपदाची बक्षिसं निश्चितच मिळणार असंही मानलं जातंय. पण टीईटी घोटाळ्याचे प्रकरण आणि त्यात अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावे समोर आल्याने आता सत्तारांना मंत्रीमंडळात स्थान मिळणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
#TETExamScam #AbdulSattar #MaharashtraCabinet #CabinetExpansion #ChandrakantKhaire #VidyaChavan #AmbadasDanve #Maharashtra #HWNews