सत्तासंघर्षानंतर राज्यातील ठाकरे सरकार (Thackeray Government) कोसळलं. त्याजागी शिंदे सरकार (Shinde Government) आलं. पण शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतरही ठाकरे सरकारमधील काही मंत्री अद्यापही सरकारी निवसस्थानातच राहत आहेत. शिंदे सरकार स्थापन होऊन महिन्याभरपेक्षा अधिक काळ लोटला आहे. पण, मंत्रिमंडळ विस्ताराचा अजून झालेला नाही. असं असलं तरी काही नेत्यांकडून सरार्सपणे सरकारी बंगल्याचा वापर सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असणाऱ्या मंत्र्यांच्या एकूण 40 बंगल्यांपैकी फक्त 18 बंगले आत्तापर्यंत रिकामे झाले आहेत. या रिकाम्या न झालेल्या १४ बंगल्यांमध्ये शिंदे गटातील माजी मंत्र्यांचा सुद्धा समावेश असल्याचं कळतंय.
#EknathShinde #MaharashtraCabinet #MahaVikasAghadi #UddhavThackeray #DadaBhuse #ChhaganBhujbal #JitendraAwhad #SaandipanBhumare #AshokChavan #HWNews