एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाची पुन्हा एकदा नव्यानं बांधणी केली जातेय. तळागाळातल्या शिवसैनिकांना भेटून आपला पक्ष मजबूत करण्याच्या मागे लागलेत. अशात उद्धव ठाकरे आता आपला हुकुमी एक्का असणाऱ्या तेजसला सुद्धा राजकारणात उतरवणार असल्याचं बोललं जातंय.