कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांनी आज पुणे महानगरपालिकेला भेट दिली. गेल्या अनेक वर्षांपासून ते राजकारणापासून दूर आहेत. एकेकाळी पुणे महानगरपालिकेमध्ये त्यांचा दबदबा होता. पुणे फेस्टिव्हलचे निमंत्रण देण्यासाठी ते पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटायला गेले होते.