Indian Startups :भारताने पार केला मान्यताप्राप्त स्टार्टअप्स मध्ये 75,000 चा टप्पा

2022-08-18 65

उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (डीपीआयआयटी) 75,000 हून अधिक स्टार्टअप्सना मान्यता दिली आहे. स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असताना हा विशेष योग जुळून आला आहे. या संदर्भातील माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग व्यवहार, अन्‍न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज जाहीर केली.