केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी CAA संदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. मंगळवारी पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांची भेट घेतल्यानंतर शाह यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांशी संबंधित कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अंतिम मुदतीची माहिती दिली. केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की, देशातील लसीकरण मोहीम पूर्ण झाल्यानंतर नागरिकत्व (सुधारणा) कायदा लागू केला जाईल.