चेन्नई एक्सप्रेस फेम Dudhsagar धबधब्याचे सौंदर्य पाहून पडाल प्रेमात, पाहा व्हिडीओ

2022-08-18 1

मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आला आहे. अनेक ठिकाणी पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. राज्यात पावसासंबंधी कारणामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. परंतु मुसळधार पावसामुळे घाटातील अनेक धबधबे खळाळून वाहू लागले आहे. मुसळधार पावसामुळे निसर्गाचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसत आहे. त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे गोव्यातील दूधसागर धबधबा आहे.