हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातील अनेक गावांना मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. मंगळवारी झालेल्या मुसळधार पाऊसामुळे आणि गारपिटीमुळे किमान 25 घरे, दोन पूल आणि काही इतर मालमत्तेचे नुकसान झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ढगफुटीमुळे नाल्यांमधील पाण्याची पातळी वाढल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल आहे, असे राज्याचे आपत्ती व्यवस्थापन संचालक सुदेश मोख्ता यांनी सांगितले.