मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अंमलबजावणी संचालनालय अर्थातच ईडीने (ED) अटक केली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (National Stock Exchange) कर्मचाऱ्यांचे फोन अवैधरित्या टॅप करणे, तसेच धनसंचय केल्याचा संजय पांडे यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात संजय पांडे यांची पाठीमागील काही दिवसांपासून चौकशी सुरु होती.