राष्ट्रपती पदासाठीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या आदिवासी महिला आहेत. देशात आदीवासी जमातीबाबत विशेष भावना आणि आदर आहे. म्हणुन राष्ट्रपती पदासाठी शिवसेनेने एनडीए उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा दिला आहे. असे संजय राऊत यांनी सांगितले आहे. उपराष्ट्रपती पदासाठी शिवसेना यूपीए उमेदवार मार्गारेट अल्वा यांना पाठींबा देणार असल्याची घोषणा खा. संजय राऊत यांनी केली आहे.