कोल्हापुरात शिवसेनेचा मेळावा पार पडला. यावेळी शिवसेना नेते संजय पवार यांनी शिंदे गटाला खुलं आव्हान दिलंय. शिंदे गटाने विधानसभा निवडणूक लढवून दाखवावी असं आव्हान त्यांनी दिलंय. तसंच यावेळी एबीपी माझाच्या मुलाखतीची ऑडिओ क्लिप ऐकवत संजय पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राजेश क्षीरसागर यांच्यावरही निशाणा साधला.