Palghar Rains : पालघरमध्ये मुसळधार, सूर्या, वैतरणा नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता

2022-07-15 41

पालघर जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागलेत. जिल्ह्यातील सर्व धरणं पूर्ण क्षमतेने भरलीत. धामणी आणि कवडास धरणातून मोठ्या प्रमाणात सूर्या नदीत विसर्ग सुरु आहे. त्यामुळे सूर्या नदीला पूर आलाय. दुसरीकडे मोडकसागरमधूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असल्याने वैतरणा नदीलाही पूर आलाय. या दोन्ही नद्या धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. आज समुद्रात मोठी भरती येणार असल्याने नदीकाठच्या गावात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

Videos similaires