आज पावसानं थोडं दमानं घ्यायचं ठरवलं असलं तरी समुद्रातलं उधाण मात्र कायम आहे. यंदाच्या मोसमातली सर्वात उंच भरती आज समुद्रात असेल... दुपारी १ वाजून २२ मिनिटांनी समुद्रात भरती आहे आणि यावेळी समुद्रात ४.८७मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. समुद्राला उधाण असल्यानं प्रशासनानं नागरिकांनाही सावधगिरीचा इशारा दिलाय. समुद्रकिनारी जाण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.