गडचिरोली जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालंय.. दक्षिण गडचिरोलीत प्राणहीता, पर्लकोटा, इंद्रावती आणि गोदावरी नद्यांना पूर आलाय. लगतच्या गावांना पुराचा फटका बसलाय. जिल्ह्यातील दहा प्रमुख मार्ग नदी-नाल्यांच्या पुरामूळे बंद झालेत.. अहेरी तालुक्यातील प्रणिता नदी काठावरील १८ गावांमधील लोकांचं स्थलांतर करण्यात येतंय..