आपला भारत देश स्वतंत्र होऊन ७५ वर्ष झालीयत. त्यासाठी यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवही आपण साजरा करतोय. पण याच देशात अशी काही गावं आहेत की जिथे अजूनही मूलभूत गरजांची वानवा आहे. आज आम्ही तुम्हाला अकोला जिल्ह्यातलं असंच एक गाव दाखवणार आहोत. हे गाव आजही पक्का रस्ता आणि गावातल्या नदीवर पूल व्हावा यासाठी संघर्ष करतंय. पण त्यांचं म्हणणं गेली कित्येक वर्ष कुणाच्या कानापर्यंत पोहोचलेलच नाही. पाहूयात झुरळ गावकऱ्यांची कहाणी 'एबीपी माझा'च्या या खास रिपोर्टमधून.