राज्यातील सत्तासंघर्षात आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी तूर्त कोणताही निर्णय घेऊ नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत. हे प्रकरण घटनापीठाकडे पाठवण्यात येणार असल्यानं सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीही आता लांबणीवर पडली आहे. सुप्रीम कोर्टानंच तसं स्पष्ट करत पुढची तारीख कळवू असं म्हटलंय. शिवसेनेतील बंडानंतर विधिमंडळ पक्षावरून ठाकरेंची शिवसेना आणि शिंदे गटात संघर्ष सुरु आहे. शिवसेनेनं १६ आमदारांना अपात्र करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे केली होती. त्याला शिंदे गटानं आव्हान दिलं होतं. त्यानंतर शिवसेनेनंही काही याचिका कोर्टात दाखल केल्या होत्या.