श्रीलंकेची परिस्थिती बिकट होत चालली आहे. प्रचंड महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत झालेली वाढ यामुळे लोक रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध करत आहेत. आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेत संतप्त नागरिक आता रस्त्यावर उतरले आहे. संतप्त नागरिकांनी राष्ट्रपती भवनावरच ताबा मिळवला.