शिवसेनेच्या सोलापूर संपर्कप्रमुखपदावरून बंडखोर आमदार तानाजी सावंत यांना हटवण्यात आलंय. त्यांच्याजागी आता मुंबईतले माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांची नियुक्ती करण्यात आलीय. तानाजी सावंत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूम-परांडा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिल्यानं त्यांना सोलापूर संपर्कप्रमुख पदावरून हटवण्यात आलंय. त्यामुळे प्रभारी संपर्कप्रमुख म्हणून अनिल कोकीळ यांची नियुक्ती करण्यात आलीय