महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत ४० आमदारांनी बंड पुकारलं आणि भाजपशी हातमिळवणी करून सत्तांतर केलं. तर तिकडे गोव्यात काँग्रेसची अवस्था शिवसेनेसारखी होण्याची दाट शक्यता आहे.. कारण गोव्यातील काँग्रेसचे ११ पैकी ८ आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचं समजतंय.. हे 8 आमदार आज किंवा उद्या काँग्रेसला रामराम करत भाजपचा झेंडा खांद्यावर घेऊ शकतात