Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी शाहू महाराजांचं नाव देण्याची छात्रभारतीची मागणी

2022-07-10 17

मुंबई विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या नामकरणाचा वाद चिघळण्याची चिन्हं आहेत. मुंबई विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव द्यावं, अशी सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वसतिगृहाचं उद्घाटन करताना कुलगुरुंना केली. तर दुसरीकडे छात्रभारतीनं वसतिगृहाला छत्रपती शाहू महाराजांचं नाव द्यावं अशी मागणी लावून धरली आहे. शाहू महाराज यांचं स्मृती शताब्दी वर्ष आहे. शाहू महाराजांचं कार्य आणि विचार लक्षात घेऊन वसतिगृहाला शाहू महाराजांचं नाव द्यावं अशी मागणी छात्रभारतीनं केलीय.

Videos similaires