शिवसेनेच्या १५ खासदारांची काल दिल्लीत डिनर डिप्लोमसी झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे आता आमदारांचं बंड ताजं असतानाच शिवसेनेचे खासदारही वेगळा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र अशी कोणतीही डिनर डिप्लोम्सी झाली नाही असं स्पष्टीकरण शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी दिलंय.