कोकणात सध्या पावसाचं धूमशान सुरू आहे.. काही भागात जनजीवनही विस्कळीत झालंय. मात्र या पावसानं कोकणातल्या हिरव्या गार निसर्गाचं रुपही अधिक खुलवलंय. दरडी कोसळण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या कुुंभार्ली घाटात निसर्गाचा हाच आविष्कार पाहायला मिळतोय. घाटातला वळणावळणाचा रस्ता, धुक्यात हरवलेले डोंगरमाथे, डोंगरातून वाट काढत प्रवाही झालेले धबधबे असं मनमोहक दृश्य इथं पाहायला मिळतंय.