Bhaskar Jadhav : विधानभवनात बहुमत चाचणीदरम्यान शिवसेनेच्या वतीने आक्रमक बोलणारे भास्कर जाधव सत्तांतरानंतर आपल्या गावाकडील शेतीत रमले आहे. विधानसभेचे विशेष अधिवेशन संपताच कोकणातील शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव त्यांच्या चिपळूण तालुक्यातील तुरंबव या गावी कुटुंबासह शेतीमध्ये काम करतना दिसले.